देवानंद यांनी केलं लाँच, अक्षय-गोविंदासोबत केलं काम तरी देखील अपयशीच, 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री आज दिसते अशी...

अनेकदा कलाकार त्याच्या कामाने नाही तर नावाने ओळखला जातो. एक अशी जी जवळपास 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब राहते. पण आज ती कशी दिसते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 28, 2024, 01:59 PM IST
देवानंद यांनी केलं लाँच, अक्षय-गोविंदासोबत केलं काम तरी देखील अपयशीच, 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री आज दिसते अशी...  title=

बॉलिवूडमध्ये अनेकदा अनेक चेहरे दिसतात. अनेकजण येतात आणि तसे निघून पण जातात. असे काही चेहरे आहेत जे चित्रपटात काम करत नाहीत पण प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. अनेक वेळा असे घडते की प्रेक्षक जरी चेहऱ्याचे वैशिष्टय विसरले तरी ते त्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे नाव विसरत नाहीत. अशीच एक अभिनेत्री आहे जिला ज्येष्ठ अभिनेता देवानंद यांनी लाँच केलं होतं. तिलाही मोठ्या अभिनेते-अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र ही अभिनेत्री स्वतःची ठोस अशी ओळख निर्माण करु शकली नाही. प्रेक्षकांना तिचे काम आठवत नसेल पण त्यांचे नाव नक्कीच लक्षात असेल.

आता अभिनेत्री अशी दिसतेय

अभिनेत्री मिंक ब्रार हिच्याबद्दल. जी बऱ्याच काळापासून चित्रपट आणि छोट्या पडद्यापासून दूर आहेत. पण लूकच्या बाबतीत ती अजूनही कुणापेक्षा कमी नाही.अभिनेत्री मिंक ब्रार पंजाबी कुटुंबातील आहे. पण तिचा जन्म जर्मनीत झाला. तिला कायद्याशी संबंधित व्यवसायात जाण्याची इच्छा होती. पण, देवानंद यांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि एव्हरग्रीन स्टारने त्यांना चित्रपटांमध्ये भूमिका देऊ केल्या.

मिंक ब्रार यांनी दीर्घकाळ चित्रपटांमध्ये काम केले. पण जेव्हा नाणे चमकले नाही तेव्हा ती चित्रपटांपासून दुरावली. आजही ही अभिनेत्री सोशल मीडिया हँडल्सवर सक्रिय आहे. तिला ओळखणारे अंदाज लावू शकतात की इतक्या वर्षांनंतरही अभिनेत्रीच्या लूकमध्ये आणि स्टाइलमध्ये कोणताही विशेष बदल झालेला नाही. जवळपास 44 वर्षांची असलेली ही अभिनेत्री आजही तितकीच सुंदर आणि क्यूट दिसते.

दक्षिण भारतीय चित्रपटातही केलंय काम

मिंक ब्रारला वयाच्या 13 व्या वर्षी फिल्मी दुनियेत येण्याची संधी मिळाली. ‘प्यार का तराना’ या चित्रपटातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. याशिवाय तिने 'जंग', 'यमराज', 'सात रंग के सपने', 'अजनबी', 'चलो इश्क लदाएं', 'हम आपके दिल में रहते हैं 'यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये ती वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणूनही दिसली होती. मात्र, पडद्यावरचा हा प्रवास 2012 मध्येच संपला. ती पुन्हा पडद्यावर येणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.