लंडन : शांततेचं नोबेल ट्युनिशियातील नॅशनल डायलॉग क्वार्टेट संस्थेला जाहीर झाले आहे. ट्युनिशियातील लोकशाहीसाठी काम केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन गौरव कण्यात आलाय.
ट्युनिशियामधल्या द ट्युनिशियन नॅशनल डायलॉग क्वार्टेट नावानं प्रसिद्ध असलेल्या चार संस्थांच्या समूदायाला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. २०११च्या जस्मिन क्रांतीनंतर ट्युनिशियामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यात या संस्थांनी मोलाची कामगिरी बजावली.
अधिक वाचा : बेलारुसच्या लेखिका स्वेटलाना यांना नोबेल जाहीर
ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, ट्युनिशयन कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री, ट्रेड अँड हँडीक्राफ्ट, ट्युनिशियन ह्युमन राईट लीग आणि ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स अशा या चार संस्था आहेत. देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी समाजाच्या विविध स्तरांमध्ये काम करणाऱ्या या चार संस्था आजही महत्त्वाचं काम करत आहेत.
नोबेल पुरस्कार या संस्थांना विभागून नव्हे, त्यांच्या संपूर्ण क्वार्टेटला देण्यात आल्याचंही नॉर्वेजियन नोबेल कमिटीनं जाहीर केलंय. २०१०-२०११मध्ये झालेल्या अरब क्रांतीची ट्युनिशिया ही जन्मभूमी. मात्र त्यानंतर क्रांती झालेले अनेक देशांमध्ये लोकशाही आणि मुलभूत हक्कांची चळवळ गोठली आहे. असं असताना नॅशनल डायलॉक क्वार्टेटच्या कामामुळे ट्युनिशियामध्ये मात्र लोकशाहीनची पाळंमुळं खोलवर रुजत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.