म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी

फ्लोरिडाच्या ओरलँडोमधल्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Jun 13, 2016, 05:26 PM IST
म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी title=

फ्लोरिडा : फ्लोरिडाच्या ओरलँडोमधल्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणी नागरिक असलेल्या उमर मतीननं हा हल्ला केला. पण या हल्ल्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. उमरनं मियामीमध्ये दोन पुरुषांना चुंबन घेताना बघितलं आणि तो नाराज झाला. 

द न्यूयॉर्क टाईम्स'नं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. हा हल्ला केल्यानंतर मतीननं 911 या नंबरवर फोनकरून आयसिसबद्दलची आपली निष्ठा बोलून दाखवली होती, पण मतीननं केलेला हा हल्ल्यामागे दुसरं कारण असल्याची प्रतिक्रिया मतीनचे वडिल सादिक मतीन यांनी दिली आहे. 

एनबीसी न्यूजला सादिक मतीन यांनी मुलाखत दिली आहे. उमरनं दोन पुरुषांना चुंबन घेताना बघितलं, हे दृष्यं बघताना उमरबरोबर त्याचा तीन वर्षांचा मुलगा होता. हा राग उमरच्या डोक्यात गेल्याचं सदिक मतीन म्हणाले आहेत. मुलाच्या या कृत्यानंतर सदिक यांनी माफीही मागितली आहे. 

उमर असं काही करेल याची मला कल्पनाही नव्हती, सगळ्या देशाप्रमाणेच आम्हालाही धक्का बसला आहे, असंही सादिक मतिन म्हणाले आहेत.