नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासचिव अॅन्टोनियो गुटेरेसनं नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून केलीय.
जगातील कोणत्याही नागरिकासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखाकडून दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. मलाल जगभरातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम मलाला करेल, अशी घोषणा संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी केलीय.
सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात मलालाला ही जबाबदारी सोपवण्यात येईल. १९ वर्षीय मलाला युसूफझई पाकिस्तानच्या पश्चिम भागात मुलांच्या शिक्षणासाठी अभियान चालवत होती. यावरून कट्टर तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्या डोक्यात गोळी घातली होती... यामध्ये मलाला गंभीर रुपात जखमी झाली होती.
अनेक अडचणी येऊनही मलालानं महिला, मुली आणि इतरांच्या शिक्षणासाठी, अधिकारासाठी काम सुरूच ठेवलं आणि म्हणूनच तिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून करण्यात आल्याचं गुटेरेस यांनी म्हटलंय.