कॅलिफोर्निया : स्वतात बिर्याणी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडत असेल, की ही स्वस्तातली बिर्याणी म्हणजे 'कव्वा बिर्याणी' (कावळ्याची बिर्याणी) तर नाही. मात्र ब्रँण्डेड कंपनीला चांगले पैसे मोजूनही, 'चिकन फ्राय ' मागितल्यावर त्यांनी 'उंदीर फ्राय ' पाठवून दिला आहे.
'केएफसी'मध्ये एका ग्राहकाने 'चिकन फ्राय'ची मागणी केली. परंतु, त्याला उंदीर फ्राय दिल्याची तक्रार त्याने केली आहे.
सोमवारी याबाबतचा व्हिडिओही अपलोड केला आहे. 'चिकन फ्राय' नसून तो फ्राय उंदीर असल्याचे मान्य केले आहे,‘ असेही डिक्सन यांनी म्हटलंय.
कॅलिफोर्नियातील वॉट्स भागात राहणारे डिवोरीइज डिक्सन यांनी शुक्रवारी फेसबुक पेजवर फ्राय झालेला उंदीर अपलोड केला आहे. तेव्हापासून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून फ्राय झालेला उंदीर चांगलाच फिरू लागला आहे.
डिक्सन यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, ‘केएफसी‘मधून ‘चिकन फ्राय ‘ची मागणी केली होती. परंतु, मला फ्राय उंदीर मिळाला. ही गोष्ट व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी माफी मागितली. मला आता वकिलाची गरज आहे. परंतु, ‘फास्ट फूड‘न खाणेच योग्य आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.