भीतीदायक : बांगलादेशातील एका माणसाचे होतेयं 'झाडा'त रुपांतर

बांगलादेशात दक्षिणेला असलेला खुलना जिल्ह्यातील अबुल बजानदार एक विचित्र आजाराने ग्रासले आहे. त्याच्या शरिरावर एक विचित्र लाकडासारखे आवरण चढू लागले आहे. त्याचे वजन सुमारे ५ किलोच्या आसपास आहे. 

Updated: Aug 25, 2016, 09:23 PM IST
भीतीदायक : बांगलादेशातील एका माणसाचे होतेयं 'झाडा'त रुपांतर  title=

ढाका : बांगलादेशात दक्षिणेला असलेला खुलना जिल्ह्यातील अबुल बजानदार एक विचित्र आजाराने ग्रासले आहे. त्याच्या शरिरावर एक विचित्र लाकडासारखे आवरण चढू लागले आहे. त्याचे वजन सुमारे ५ किलोच्या आसपास आहे. 

या माणसाला लाकडी माणूस म्हणून संबोधण्यात येत आहे. एखाद्या कुऱ्हाडने लाकडावर घाव केल्यावर जसे लाकूड दिसेल तसा या माणसाचे दोन्ही हात दिसत आहे. आता ऑपरेशन करून त्याचे हे अतिरक्त वाढलेले अवयव काढण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षापासून त्याचे हे अवयव वाढत असल्याचे रुग्णालयाने सांगितले. 

अशा प्रकारे वाढलेले अवयव भीतीदायक वाटतात पण ते धोकादायक नाही. असे २६ वर्षीय अबूने ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एएफपीशी बोलताना सांगितले. 

हा आजार सुरू झाल्यानंतर मी हळूहळू काम करण्याची माझी शक्ती गमवून बसलो. माझ्या हातावर दोन ते तीन डझन झाडाची मूळ असल्यासारखे अवयव वाढले आहेत. असे माझ्या पायावरही छोटे मूळ आहेत. 

अबू यापूर्वी हातरिक्षा चालवत होता.  तो किशोरवयीन असल्यापासून हा आजार सुरू झाला. त्यानंतर गेल्या ४ वर्षापासून ही लाकडासारखे अवयव झपाट्याने वाढत आहेत. या आजाराला epidermodysplasia verruciformis असे म्हणतात. हा एक कोट्यावधी लोकांमध्ये एकाला होणारा स्किन डिसीज आहे.