अल्पवयीन मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेला कारावास

ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाला आपल्या नादी लावून त्याच्याकडून शारीरिक सुख घेऊन त्याच्यापासून मुल होऊ दिलेल्या एका महिलेला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेय.

Reuters | Updated: Jul 29, 2015, 04:46 PM IST
अल्पवयीन मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेला कारावास title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाला आपल्या नादी लावून त्याच्याकडून शारीरिक सुख घेऊन त्याच्यापासून मुल होऊ दिलेल्या एका महिलेला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेय.

आरोपी महिलेने आपली लैंगिक भूक भागविण्यासाठी या मुलाला नादीला लावले. ऑस्ट्रेलियातील न्यायालयापुढे हे प्रकरण आले असता न्यायालयाने ही कारावासाची शिक्षा ठोठावली. व्हिक्टोरिया कौंटीमधील न्यायालयाने ही शिक्षा देताना या ३६ वर्षांच्या महिलेस लैंगिक अत्याचाराखेरीज त्या मुलाचे बालपण हिरवून घेतल्याबद्दल दोषी ठरविले.

दरम्यान, पिडित अल्पवयीन मुलाचे भावी आयुष्य खराब होऊ नये यासाठी न्यायालयाने आरोपी महिला आणि अत्याचारित मुलाचे नाव प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध केलाय. न्यायाधीश जेन पॅट्रिक यांनी आरोपी महिलेने गुन्हा कबूल केल्यानंतर शिक्षा ठोठावली.

शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी आरोपी महिलेस खडसावले. आपण जे करीत आहोत ते सर्वस्वी चुकीचे आहे, याची जाणीव असूनही तू तेच वर्तन करीत राहिलीस. तू त्या निष्पाप मुलाचे बालपणच हिरावून घेतलेस. त्याच्यावर तू पितृत्व लादलेस आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचे त्याचे वयही नाही! 

दरम्यान, 'दि मेलबर्न एज' या वृत्तपत्राने याविषयी वृत्त दिलेय. ही आरोपी महिला तीन मुलांची आई आहे. तिने ज्या मुलावर असे लैंगिक अत्याचार केले तो शाळेत तिच्याच मुलीच्या वर्गात होता. 

आरोपी महिला या दोघा मुलांना आपल्या कारमधून शाळेत सोडायची व आणायची. तिचे या मुलावर प्रेम बसले व तिने कोणतीही कुटुंब नियोजन साधने न वापरता सुमारे दोन वर्षे या मुलाकडून नियमितपणे लैंगिक संबंध करवून घेतले. यातून तिला दिवस गेले. मे महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला.

हा प्रकार पिडित मुलाच्या घरी समजला. त्यानंतर घरच्यांनी या महिलेला जाब विचारला. तिने इन्कार केल्यावर प्रकरण पोलिसांकडे गेले. पुढे डीएनए चाचणीतून तिला झालेले मूल याच मुलापासून झाल्याचे निष्पन्न झाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.