इस्लामाबाद: तालिबानी प्रमुख आणि दहशतवादी मुल्ला उमर ठार झाल्याचं कळतंय. बीबीसीनं अफगाणिस्तानच्या सूत्रांकडून ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वीच मारला गेलाय. अद्याप तालिबानकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र खम्मा प्रेसनं उमर दोन वर्षांपूर्वी मारला गेल्याचं सांगितलंय.
अनेकदा मुल्ला उमर ठार झाल्याची बातमी आलीय, पण कधीच त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं नाही.
रिपोर्टनुसार एका स्थानिक अफगाण पत्रकार हारून नजाफीजादा यांनी अफगाणिस्तान सरकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरवर ही माहिती दिलीय. अफगाणिस्तानमध्ये या पत्रकारानं ट्विट करून सांगितलं की, अफगाण नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटमध्ये त्यांचे दोन विश्वासपूर्ण सूत्र आहेत. त्यांनी सांगितलं की, तालिबानी प्रमुख मुल्ला उमर मेलाय. २०१३ मध्येच मुल्लाचा मृत्यू झाला होता.
मुल्ला उमर हा ओसामा बिन लादेनचा सासरा होता. ज्यावेळी लादेन अफगाणिस्तानात राहायचा तेव्हा मुल्ला उमरनं आपल्या एका मुलीसोबत लादेनचं लग्न लावलं होतं. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी नेतृत्व असलेल्या नाटो सेना असतांना मुल्ला उमर खूप दिवस पाकिस्तानाच लपलेला होता. मुल्ला उमर तालिबानचा सुप्रीम कमांडर आणि धार्मिक नेता होता. १९९६ ते २००१ पर्यंत त्यानं अफगाणिस्तानावर राज्य केलं. मुल्ला उमर अफगाणिस्तानचा ११वा हेड ऑफ द स्टेट होता.
(with angancy inputs)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.