टीव्हीचा रिमोट हरवला म्हणून केली पोलिसांकडे तक्रार

पोलिसांकडे चोरी, गुन्ह्याच्या तक्रारी नेहमी दाखल होत असतात. मात्र एका महिलेने चक्क टीव्हीचा रिमोट हरवला म्हणून तक्रार दाखल केल्याची घटना टौनटोनमध्ये घडली.

Updated: Jul 11, 2016, 04:28 PM IST
टीव्हीचा रिमोट हरवला म्हणून केली पोलिसांकडे तक्रार

लंडन : पोलिसांकडे चोरी, गुन्ह्याच्या तक्रारी नेहमी दाखल होत असतात. मात्र एका महिलेने चक्क टीव्हीचा रिमोट हरवला म्हणून तक्रार दाखल केल्याची घटना टौनटोनमध्ये घडली.

घडले असे की, महिलेचा टीव्हीचा रिमोट हरवला. तिच्या टीव्हीचा आवाज मोठा होता. टीव्हीच्या आवाजाने शेजारी वैतागून पोलिसांना फोन करतील अशी भिती त्या महिलेला वाटल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. 

दरम्यान, आपण याबाबत कोणतीही मदत करु शकत नसल्याचे पोलिसांनी त्या महिलेस सांगितले. तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी हे संभाषण सार्वजनिकही केले. जेणेकरुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी.