टोकियो: जपानमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणार्या साकारी मोमोई यांचं मंगळवारी वयाच्या ११२ व्या वर्षी निधन झालं.
पोषक आहार आणि भरपूर झोप त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक होतं. किंबहुना दीर्घायुष्य लाभावं यासाठी ते आपल्या संपूर्ण आयुष्यात चांगल्या आहाराबरोबरच प्रचंड झोप घेत असत. गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून गौरविण्यात आलं होतं.
त्यावेळी त्यांनी आणखी दोन वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु दुर्दैवानं त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.