7 हजार 548 वादकांचा ऑर्केस्ट्राचा विश्वविक्रम

जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये शनिवारी रात्री एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.

Updated: Jul 10, 2016, 10:57 PM IST
7 हजार 548 वादकांचा ऑर्केस्ट्राचा विश्वविक्रम title=

फ्रँकफर्ट: जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये शनिवारी रात्री एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. तब्बल 7 हजार 548 वादकांनी एका फुटबॉल स्टेडियमवर एकत्र येऊन सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्रा वादनाचा विक्रम केला. एका 28 वर्षीय संगीत शिक्षकानं हा सगळा लवाजमा गोळा केला.  

याआधी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये 7हजार 224 वादकांनी सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला होता. त्यांचा विक्रम जर्मनीतल्या या खुल्या मैफलीत मोडीत काढण्यात आला.

पाहा विश्वविक्रमाचा व्हिडिओ