इंडोनेशियाजवळ बोट बूडल्याने २१५ जण बेपत्ता

इंडोनेशियातील जावा बेटाजवळ २०० निर्वासितांना घेऊन जाणारी एक लाकडाची बोट बूडाल्याचं वृत्त आहे. या बोटीत जवळपास २०० प्रवासी होते त्यापैकी फक्त ३३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बोटीच्या क्षमतेच्या दुप्पत प्रवासी असल्याचं पोलिसांचे म्हणणं असल्याचं वृत्त ‘अंतरा’ या अधिकृत न्यूज एजन्सीने दिलं आहे.

Updated: Dec 18, 2011, 11:14 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

इंडोनेशियातील जावा बेटाजवळ २०० निर्वासितांना घेऊन जाणारी एक लाकडाची बोट बूडाल्याचं वृत्त आहे. या बोटीत जवळपास २०० प्रवासी होते त्यापैकी फक्त ३३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बोटीच्या क्षमतेच्या दुप्पत प्रवासी असल्याचं पोलिसांचे म्हणणं असल्याचं वृत्त ‘अंतरा’ या अधिकृत
न्यूज एजन्सीने दिलं आहे.

 

बोटीत वाचवण्यात आलेल्या एका प्रवाश्याने बोट डगमगू लागल्याने घबराट पसरली आणि गोंधळ माजल्याचं सांगितलं. बोटीत लोक खच्चं भरल्याने हालचाल करायला देखील जागा नव्हती असं एका अफगाण स्थलांतरिताने सांगितलं.बोटीवर गोंधळ माजल्याने ती कलंडली आणि बूडाली. बोटीवरच्या काही प्रवाशांनी हाताला येईल त्या बोटीच्या तुकड्यांच्या आधाराने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवलं. बोटीवर चाळीस लहान मुलं देखील होती.

 

इंडोनेशिया हा १८००० हून अधिक बेटांचा आणि हजारो मैलांची किनारपट्टी लाभलेला देश आहे. इंडोनेशियाची किनारपट्टीवर गस्त नसते त्यामुळे निर्वासितांना तस्करीसाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. बोटीवर असलेली लोकं अफगाणीस्तान, टर्की, इराण आणि सऊदी अरेबियातून ऑस्ट्रेलियाकडे चालली
होती. मेट्री टीव्हीने दिलेल्या वृत्तात फक्त ३३ जणं बचावल्याचं आणि २१५ जण बेपत्ता असल्याचं वृत्त दिलं आहे.

मागच्या महिन्यात अफगाणीस्तान, इराण आणि पाकिस्तानातून ७० स्थलांतरितांना घेऊन चाललेली एक बोट मध्य जावात बूडाली आणि त्यात आठ जणांचा मृत्यु झाला होता.

Tags: