इराणवर नव्याने निर्बंध

आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणवर नव्याने निर्बंध घालण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखू, असा इशारा इराणने दिला आहे. मात्र, इराणशी चर्चेचा पर्याय उपलब्ध आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

Updated: Jan 20, 2012, 11:40 AM IST
www.24taas.com वॉशिंग्टन

आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणवर नव्याने निर्बंध घालण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखू, असा इशारा इराणने दिला आहे. मात्र, इराणशी चर्चेचा पर्याय उपलब्ध आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, इराणशी चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा पर्याय खुला आहेच; पण होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या हालचालींना तोंड देण्यासाठी त्या देशाशी संघर्ष करण्याचीही आपली संपूर्ण तयारी असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. पेंटॅगॉनमध्ये पत्रकारांशी बोलताना संरक्षणमंत्री लियोन पेनेटा यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.

आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणवर नव्याने निर्बंध घालण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखू, असा इशारा इराणने दिला आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पेनेटा बोलत होते. इराणच्या हालचालींना तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मात्र, इराणशी चर्चेचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे इराणने काय निर्णय घ्यावा ते त्यांनी ठरवावे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.