क्लासमध्ये शिकवतात श्रीमंत नवरा कसा गटवावा...

आपला नवरा श्रीमंत असावा अशी अपेक्षा तमाम महिला वर्गाला असते...आणि श्रीमंत नवरा गटवण्यासाठी खास क्लासेस सुरू झाले हेत. चीनमध्ये हा कोचिंग क्लास सुरू झाला आहे. सू फेई असे या महिलेचे नाव आहे. ४२ वर्षीय सू फेई केवळ विवाहाचे धडे देत नाही तर श्रीमंत व्यक्तीची गाठ घालून देण्याची संधीही उपलब्ध करून देते.

Updated: Jul 12, 2012, 01:39 PM IST

www.24taas.com, बीजिंग

 

आपला नवरा श्रीमंत असावा अशी अपेक्षा तमाम महिला वर्गाला असते...आणि श्रीमंत नवरा गटवण्यासाठी खास क्लासेस सुरू झाले हेत. चीनमध्ये हा कोचिंग क्लास सुरू झाला आहे. सू फेई असे या महिलेचे नाव आहे. ४२ वर्षीय सू फेई केवळ विवाहाचे धडे देत नाही तर श्रीमंत व्यक्तीची गाठ घालून देण्याची संधीही उपलब्ध करून देते. श्रीमंत लोकांना आकर्षित करण्याच्या  प्रशिक्षणासाठी ती सुमारे 87 हजार रुपये  फी आकारते.

 

सध्या तिच्याकडे 12 विद्यार्थिनी श्रीमंत नवरा गटवण्याचे धडे गिरवत आहेत. सात वर्षांपूर्वी तिने शेनझेन, गुआँगडाँग प्रांतात हे क्लासेस सुरू केले होते. यामध्ये 100 उपवर तरुणी, महिलांनी प्रशिक्षण घेतले होते. हे वर्ग जोरात चालल्यामुळे तिने आता चेंगडू शहरात आपली शाखा सुरू केली आहे. श्रीमंत माणसांकडे कसे अ‍ॅप्रोच व्हावे, त्यांच्याशी कसे डेटिंग करावे, नात्याला अधिक गहिरेपणा कधी द्यावा एवढेच नव्हे तर महागडे गिफ्ट्स कधी घ्यावेत याबद्दल सू फेई इच्छुक तरुणींना मार्गदर्शन करतात.

 

धनाढ्य माणसांना शिक्षिका, डॉक्टर्स आणि शासकीय महिला अधिकारी आवडतात. तर हवाई सुंदरी, पत्रकार आणि दुकानदार महिला आवडत नाहीत, असे सू फेई यांचे निरीक्षण आहे. एखादा अब्जाधीश आपल्यासोबत दोन वर्षे फिरत असेल; परंतु विवाहाचे नावही काढत नसेल तर मग त्याची पत्नी होण्याचे भाग्य आपल्या भाळी नाही हे निश्चित, असे फेई म्हणतात.