तीन शास्त्रज्ञांचा अमेरिकेत सन्मान

वैज्ञानिक संशोधन आणि अभिनव कल्पना क्षेत्रत उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकेत तीन भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांना गौरविण्यात येईल.

Updated: Oct 9, 2011, 01:29 PM IST

झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन

वैज्ञानिक संशोधन आणि अभिनव कल्पना क्षेत्रत उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकेत तीन भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांना गौरविण्यात येईल.

न्यूयॉर्क विद्यापीठातील श्रीनिवास एस. आर. वर्धन, परडवे विद्यापीठातील राकेश अग्रवाल आणि नॉर्थ कॅरोलिना स्टेट विद्यापीठातील के. बी. जयंत बालिगा अशी या तिघांची नावे आहेत. या सर्वाना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

वर्धन यांना ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ तर अन्य दोघांना ‘नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन’ या पुरस्कारांनी गौरविण्यात येईल.

Tags: