नायजेरियात भीषण विमान अपघात

नायजेरियामधील लागोस शहरात प्रवासी विमान कोसळल्यानं तब्बल १५३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतोय. दाना एअरलाईन्सचं विमान लागोसमधून राजधानी अबुजाकडे उड्डाण करत होते.

Updated: Jun 4, 2012, 09:40 AM IST

www.24taas.com, लागोस

 

नायजेरियामधील लागोस शहरात प्रवासी विमान कोसळल्यानं तब्बल १५३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतोय. दाना एअरलाईन्सचं विमान लागोसमधून राजधानी अबुजाकडे उड्डाण करत होते. मात्र विमान लागोस इथंच रहिवासी विभागात कोसळलं.

 

विमानानं पेट घेतल्यामुळे दुर्घटनेत कुणी बचावले असल्याची शक्यता कमी आहे. असं नायजेरियाच्या नागरी हवाई खात्याकडून सांगण्यात आलं. मृतांचा निश्चित आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. वैमानिक आणि क्रू मेंबर्ससह विमानात १५३ जण होते. त्यावरून मृतांच्या आकडा सांगण्यात येतोय.

 

ही दुर्घटना लागोस प्रांतातील इफाको येथील बस स्थानकानजीक घडली. या घटनेत पायलट, प्रवासी यांच्याबरोबरच विमान ज्या घरांवर पडलं, त्या घरांमधील लोकांचाही मृत्यू झाला असावा. दुर्घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं. या अपघातात नेमकी किती मनुष्यहानी झाली आहे, याबाबत कुठलंही उत्तर देण्यास प्रशासनाने नकार दिला आङे.