फिलिपीन्समध्ये पुराचे थैमान, हजारो मृत्युमुखी

फिलिपीन्स मधल्या विनाशकारी पुरात १००० जण मृत्युमुखी पडल्याचं तसंच हजाराहून अधिक जण बेपत्ता असल्याचं वृत्त फिलिपीन्स सरकारने दिलं आहे. आतापर्यंत १०८० लोकं मरण पावली आहेत.

Updated: Dec 24, 2011, 08:50 AM IST


झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

फिलिपीन्स मधल्या विनाशकारी पुरात १००० जण मृत्युमुखी पडल्याचं तसंच हजाराहून अधिक जण बेपत्ता असल्याचं वृ


त्त फिलिपीन्स सरकारने दिलं आहे. आतापर्यंत १०८० लोकं मरण पावली आहेत. ग्रामीण भागातील अनेक जण पुराचा तडाखा बसलेल्या दक्षिण फिलिपीन्सच्या शहरांमध्ये कामासाठी गेल्याचं आणि परतले नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी कळवल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झालं आहे.

 

दक्षिणेतील काग्यान डे ओरो आणि इलिगन या बंदरांमध्ये पूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्युमुखी पडली आहेत. या कुटुंबांचे कोणीही नातेवाईक शहरात नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत चौकशी करणारंही कोणीही शिल्लक नाही. फिलिपीन्सला बसलेल्या वादळाच्या तडाख्यानंतर आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झालं. त्यानंतर  नातेवाईकांचा शोध घेणाऱ्यांनी अनेक जण बेपत्ता झाल्याचं कळवलं. पुरातून वाचलेल्यांपैकी अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी किंवा बेपत्ता झाल्याचा मानसिक धक्का सहन करावा लागला आहे. जखमींपैकी अनेक जण आता आपल्या नातेवाईकांबद्दल चौकशी करत आहेत. शवागृहांमध्ये प्रेतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

 

काग्यान डे ओरो हे पाच लाख आणि इलिगन बंदर शहराची लोकसंख्या लाखभर आहे तिथे संपूर्ण उपनगरे पुराच्या तडाख्यात उध्वस्त झाली आहेत. संयुक्त हाय कमिशनरने तातडीने मदतीची व्यवस्था केली आहे.