मुंबई हल्ल्याला पाकचे समर्थन - चिदंबरम

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला पाकिस्तानचं समर्थन होतं, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर सरकारमधल्या काही लोकांनी यात सक्रिय सहभाग घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Updated: Jun 27, 2012, 03:56 PM IST

www.24taas.com,, नवी दिल्ली

 

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला पाकिस्तानचं समर्थन होतं, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर सरकारमधल्या काही लोकांनी यात सक्रिय सहभाग घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमही पाकिस्तानातच असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानात दाऊदला सुरक्षित आसरा मिळाला आहे. जरी पाकिस्तान म्हणत असले तरी दाऊद हा पाकिस्तानातच तळ ठोकून आहे. त्याच्या अतिरेकी कारवायांना पाकमधून संरक्षण मिळत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान,  26/11च्या हल्ल्याच्या दहशतवादी हल्यामागे पाकिस्तानची आय़एसआय आहे यासंदर्भात भारताची सुरक्षा यंत्रणा वारंवार पुरावे देतेय.. पण आता मात्र या सा-या पुराव्याना बळकटी मिळतेय.. पाकीस्तानात 26/11च्या हल्ल्यावेळी, कसाबसह अन्य दहशतवाद्यांना हिंदी आणि मराठीचे धडे देणारा अबू जिंदाल हाच कंट्रोलरुम मधून आदेश देत होता.  हा कट जरी तडीस नेण्यात कसाबचा हात असला तर यामागचे मास्टरमाईंड बसले होते पाकिस्तानच्या कंट्रोलरुम मध्ये.. पाकिस्तानात असलेल्या कंट्रोल रुममधून बसलेल्या व्यक्तीनी कसाब आणि त्याच्या साथीदाराना निर्देश दिलेच नसते तर  भारतावरचा सर्वात मोठा आतंकवादी हल्लाचा कट तडीस गेला नसता, हे आता उघड झाले आहे.

 

अबू जिंदाल  ही व्य़क्ती कोणी एक फक्त आतंकवादी नव्हती तर ही होती आतंवाद्याचा हॅँडलर.. याच आतंकवाद्याने  लष्कर तय्यैबाच्या सांगण्यावरून देशात ठिकठीकाणी बॉम्बस्फोट केले होते. हे त्यांने कबुल केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे चिदंबरम यांनी केलेल्या आरोपाचे गांर्भिय पाक घेते याकडे लक्ष लागले आहे.