www.24taas.com, चीन
चीनच्या जिन्गासू या प्रांतातील इथला एक भलामोठा पुल पाडण्यात आला. ज्याची लांबी होती ११५६ मीटर. अवघ्या ७ सेकंदात हा पुल पाडण्यात आला. चीनच्या पूर्व भागातील हा पूल जुना झाला होता.
या भागात नवीन रस्त्यांचं काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी हा जुना पुल हटवणं गरजेचं होतं. तब्बल ६०२ किलो स्फोटकं वापरून हा पूल पाडण्यात आला. पूल पाडण्यापूर्वी हा भाग पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला होता.
आता याभागामध्ये लवकरच नवा पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा जुना पूल हटवणं गरजेचं होतं, तेथील प्रशासनाने जाहीर केले आहे की, फारच थोड्या वेळात हा पूल पुन्हा नव्याने तयार होईल.