आशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री

 आशिकी आणि आशिकी-२ नंतर आगामी येऊ घातलेल्या आशिकी-३ बद्दल सध्या बी टाऊनमध्ये चर्चांचा बाजार खूप गरम आहे. 

Bollywood Life | Updated: Mar 11, 2016, 10:09 PM IST
आशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री title=

मुंबई :  आशिकी आणि आशिकी-२ नंतर आगामी येऊ घातलेल्या आशिकी-३ बद्दल सध्या बी टाऊनमध्ये चर्चांचा बाजार खूप गरम आहे. 

आशिकी-३मध्ये हृतिक रोशन हा कन्फर्म आहे, पण त्यासोबत कोणती अभिनेत्री घ्यायची याचा खल सुरू आहे.

आता या चर्चेत हृतिकपेक्षा वयाने २० वर्ष लहान असलेल्या आलिया भट्ट हिचे नाव समोर येत आहे. 

ही अफवा खरी असेल तर पहिल्यांदा हृतिक आणि आलिया रोमान्स करताना दिसणार आहे.  

आलियाने हा चित्रपट केला तर भट्ट कॅम्प मधील पहिला चित्रपट आलिया करणार आहे.