कॅलिफोर्निया : सिनेमा सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला शानदार सुरुवात झाली. कॅलिफोर्नियातील हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये ८८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडत आहे. भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.
सोहळ्यासाठी अॅडम मके, जॉर्ज मिलर, लिओनार्दो डीकॅप्रिओ, एडी रेडमेन, सेआर्यस रोनन, ब्री लार्सन, जेनिफर लॉरेन्स, रोनी मारा आदी दिग्गजांचे रेड कार्पेटवर आगमन झालेय.
द बिग शॉट, ब्रिज ऑफ स्पाईज, ब्रुकलिन, मॅड मॅक्स: फ्युरी रोड, द मार्शन, द रेवेनंट, रुम आणि स्पॉटलाइट या सिनेमांना नामांकन मिळालेय. मात्र, कोणाला हा ऑस्कर मिळणार याची उत्सुकता लागली आहे. ऑस्कर हा हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा आहे.
ऑस्कर २०१६ पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट पटकथा : स्पॉटलाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अलिसिया विकॅन्डर (द डॅनिश गर्ल)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल - लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)