'ऐ दिल है मु्श्किल'च्या प्रमोशनमधून ऐश्वर्या राय गायब का आहे?

ऐश्वर्या राय-बच्चन बऱ्याच काळानंतर 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात ग्लॅमरस अवतारात दिसणार आहे.

Updated: Oct 20, 2016, 03:03 PM IST
 'ऐ दिल है मु्श्किल'च्या प्रमोशनमधून ऐश्वर्या राय गायब का आहे? title=

मुंबई : ऐश्वर्या राय-बच्चन बऱ्याच काळानंतर 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात ग्लॅमरस अवतारात दिसणार आहे. तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीये की वयाच्या 42व्या वर्षीही ऐश इतकी हॉट दिसू शकते. मात्र या सिनेमाच्या प्रमोशनमधून ऐश गायब का आहे, असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असेल.

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरचं हे बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरतयं.मात्र तरी पण ऐ दिल है मु्श्किलच्या प्रमोशनमधून ऐश्वर्या राय-बच्चन गायब का आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सगळीकडेच फक्त रणबीर कपूर दिसतोय..अनुष्का द रिंगच्या शूट मध्ये व्यस्त आहे आणि फवाद खानलाही या सिनेमाच्या प्रमोशनपासून लांब ठेवण्यात आलयं. त्यामुळेच रणबीर आणि ऐश एकत्र या सिनेमाचं प्रमोशन करु शकत होते.

मात्र ऐशला प्रमोशनपासून लांब ठेवल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत..ऐश्वर्याला प्रमोशनपासून लांब ठेवण्याचे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते..अखेर ऐश्वर्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हा सिनेमा माझ्याबद्दल नाहीये. माझ्यापेक्षा सिनेमात अनुष्काचा रोल मोठा आहे. हा सिनेमा रणबीर कपूर भोवती फिरतो.त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांवर आधारित हा सिनेमा आहे.त्यामुळेच मी प्रमोशनमध्ये जास्त सहभागी होत नाहीये.

हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनुष्का आणि ऐश्वर्या रणबीरकपूर बरोबर कपिल शर्माच्या शोमध्ये सहभाही होणार असल्याची चर्चा आहे.

हा एपिसोड 21 आणि 22 ऑक्टोबरला शूट केला जाणार आहे..जर झालं तर कमी वेळात या सिनेमाला अजुन चांगली पब्लिसीटी मिळण्यासाठी मदत होईल.त्यामुळेच आता अनुष्का आणि ऐश्वर्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये केव्हा सहभागी होतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.