'बाहुबली 2' पाहिल्यानंतर अक्षय कुमार पाहा काय म्हणालाय...

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे अनेक इमले रचतोय. सर्वच स्तरातून बाहुबलीचे कौतुक केले जातेय.

Updated: May 15, 2017, 10:44 PM IST
'बाहुबली 2' पाहिल्यानंतर अक्षय कुमार पाहा काय म्हणालाय... title=

मुंबई : एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे अनेक इमले रचतोय. सर्वच स्तरातून बाहुबलीचे कौतुक केले जातेय.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही नुकताच बाहुबली 2 हा सिनेमा पाहिला. त्यानंतर ट्विटरवरुन त्याने या सिनेमाबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

अखेर बाहुबली द कनक्लूजन हा सिनेमा पाहिला. बाहुबलीला मिळत असलेले यशाचे ते हकदार आहेत. भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. संपूर्ण टीमचे अभिनंदन, असं अक्षयनं ट्विटरवर म्हटलंय. 

देशात तसेच देशाबाहेरही बाहुबली 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने कमाईचा उच्चांकच गाठलाय.