कॉमेडी नाईट्सच्या वादावर अखेर दादी बोलली

'कॉमेडी नाईट्स विथ कपील' या शोबाबतचं मौन अली अजगरनं सोडलंय.

Updated: Jan 20, 2016, 09:33 PM IST
कॉमेडी नाईट्सच्या वादावर अखेर दादी बोलली title=

मुंबई : 'कॉमेडी नाईट्स विथ कपील' या शोबाबतचं मौन अली अजगरनं सोडलंय. प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनलमध्ये वाद झाल्याचं अलीनं मान्य केलंय. 

शो बंद होईल याबाबत आम्हाला २५ दिवस आधीपासूनच कल्पना होती, पण या वादावर काही तरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती, असं अली अजगर म्हणालाय.

 

शेवटच्या भागाचं शूटिंग करताना आम्ही सगळेच भाऊक झालो अशी प्रतिक्रिया अली अजगरनं दिलीये. कलाकार भाऊक झाल्याचा व्हिडीओ याआधीच लिक झाला होता, पण कलर्स चॅनलनं हा व्हिडीओ ब्लॉक केला. 

कपीलच्या शो चा शेवटचा भाग कधी ?

कॉमेडी नाईट्स विथ कपील या लोकप्रिय शोचा शेवटचा भाग २४ जानेवारीला ऑन एअर होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवरून ही माहिती दिलीये. 

कपील शर्मासोबत झालेल्या वादामुळे कलर्स वाहिनीनं या शोचा शेवटचा भाग प्रसारित झाला नव्हता. कॉमेडी नाईट्स विथ कपीलचा शेवटचा भाग १७ जानेवारीला प्रसारित होणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी कलर्स चॅनलनं कॉमेडी नाईट्स बचाव हा शो प्रसारित केला. 

आता मात्र २४ तारखेला अक्षय कुमार आणि त्याच्या एअरलिफ्ट सिनेमाच्या टीमबरोबर कपीलच्या शोचा शेवटचा भाग दाखवण्यात येणार आहे.