आमीर खानने दिला सनी लिऑनसोबत काम करण्यास होकार

मुंबई : गेले दोन दिवस गाजत असलेल्या सनी लिओनीच्या मुलाखतीवर आमीर खानने आता प्रतिक्रिया दिलीये.

Updated: Jan 20, 2016, 06:11 PM IST
आमीर खानने दिला सनी लिऑनसोबत काम करण्यास होकार title=

मुंबई : गेले दोन दिवस गाजत असलेल्या सनी लिओनीच्या मुलाखतीवर आमीर खानने आता प्रतिक्रिया दिलीये. मुलाखतकाराने विचारलेल्या 'आमिर खान (तुझ्या भूतकाळामुळे) तुझ्यासोबत काम करेल असं वाटतं का?' या प्रश्नाला सनीने 'आमिरसोबत काम करायला कोणाला आवडणार नाही? (पण माझ्या भूतकाळामुळे) आमीर माझ्यासोबत काम करेल असे वाटत नाही,' असे उत्तर दिले होते.

पण आता मात्र एका ट्वीटच्या माध्यमातून सनीला उत्तर दिले आहे. 'सनीने मुलाखतीत खूप खुलेपणाने आणि अभिमानाने उत्तरे दिली आहेत. काश मुलाखतकाराविषयी पण मी हे बोलू शकलो असतो'

 

त्याच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये तो म्हणतो 'मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. मला तुझ्या भूतकाळाशी मुलाखतकाराच्या म्हणण्याप्रमाणे काहीच प्रॉब्लेम नाही. खूश राहा. भरपूर प्रेम'





सनीची ही मुलाखत तिला विचारलेल्या काही वादग्रस्त प्रश्नांमुळे गाजली होती.