रणबीर-कतरिनाचं ब्रेक अप कुणामुळे ?

रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप दिपीकामुळे झाल्याच्या चर्चा आजपर्यंत बॉलीवूड जगतात रंगत होत्या. पण आता या ब्रेकअपला भलतीच व्यक्ती जबाबदार असल्याचं बोललं जातंय. 

Updated: Jan 22, 2016, 05:21 PM IST
रणबीर-कतरिनाचं ब्रेक अप कुणामुळे ? title=

मुंबई : रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप दिपीकामुळे झाल्याच्या चर्चा आजपर्यंत बॉलीवूड जगतात रंगत होत्या. पण आता या ब्रेकअपला भलतीच व्यक्ती जबाबदार असल्याचं बोललं जातंय. 
रणबीर-कतरिनाच्या ब्रेक अपला आलिया भट जबाबदार असल्याचा दावा एका वेबसाईटनं केलाय. रणबीर आणि आलियाची वाढत चाललेली जवळीक कतरिनाला खुपत होती, त्यामुळे या दोघांचं ब्रेक अप झाल्याचं या वेब साईटनं सांगितलंय.

रणबीर आणि कतरिनामधल्या वादाला इम्तियाज अलीच्या घरामध्ये सुरुवात झाली. रणबीर, कतरिना आणि आलियाला इम्तियाजनं आपला पुढचा चित्रपटाबाबत बोलण्यासाठी बोलावलं, त्यावेळी या दोघांचं वागण्यामुळे कतरिना नाराज झाली, असं या वेबसाईटनं छापलंय.

एवढच नाही, आपल्या कार्टररोडच्या बंगल्यावर दिलेल्या पार्टीत कतरिनानं आलियाला बोलावलं नाही. अयान मुखर्जी रणबीर, कतरिना आणि आलियाबरोबर एक नवा चित्रपट करत आहेत, या चित्रपटातही कतरिनाला आलिया नको होती, पण तिची ही इच्छा पूर्ण झाली नाही, असा दावाही या वेबसाईटनं केलाय.