अमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुस्साट सुरु आहे. 

Updated: May 13, 2017, 09:38 PM IST
अमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर title=

मुंबई : एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुस्साट सुरु आहे. 

कमाईचे एकापाठोपाठ एक इमले रचलतोय. बाहुबली द बिगिनिंग आणि बाहुबली द कनक्लूजन या दोन्ही सिनेमातील प्रभासच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होतेय.

बाहुबली २ सिनेमा रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभासने दिलेल्या एका इंटरव्हयूमध्ये आपल्याला कोणते कॅरेक्टर अधिक आवडते आहे याबाबत सांगितले. त्याला विचारण्यात आले की अमरेंद्र की महेंद्र बाहुबली यापैकी कोणते पात्र तुझ्या आवडीचे आहे असे विचारले. 

यावर उत्तर देताना प्रभास म्हणाला, अमरेंद्र बाहुबली हे माझे आवडते पात्र आहे. अमरेंद्र बाहुबली हा राजघराण्यात जन्मलाय. तो शूरवीर आहे, त्यासाठी धर्म ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचे कॅरॅक्टर अधिक डीप वाटते. त्याच्या तुलनेत शिवडू हे कॅरॅक्टर फार स्वच्छंदी आहे. त्याला हवे ते करता येते. मात्र मला अमरेंद्र बाहुबली हेच कॅरॅक्टर अधिक आवडले.