एकत्र दिसणार अमिताभ, रजनीकांत आणि कमल हसन!

महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन हे तिघंही एकापेक्षा एक आहेत. तिघांचाही त्यांचा चाहतावर्ग देव मानतो. अशावेळी हे तिघंही एका मंचावर दिसणार असतील तर.. हे अदभुत दृश्य आज मुंबईतील एका पंचतारांकीत हॅाटेलमध्ये दृष्टीस पडणार आहे. जिथं सिनेसृष्टीतील हे तीन बिग स्टार एकत्र एका मंचावर दिसतील.

Updated: Jan 20, 2015, 01:29 PM IST
एकत्र दिसणार अमिताभ, रजनीकांत आणि कमल हसन! title=

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन हे तिघंही एकापेक्षा एक आहेत. तिघांचाही त्यांचा चाहतावर्ग देव मानतो. अशावेळी हे तिघंही एका मंचावर दिसणार असतील तर.. हे अदभुत दृश्य आज मुंबईतील एका पंचतारांकीत हॅाटेलमध्ये दृष्टीस पडणार आहे. जिथं सिनेसृष्टीतील हे तीन बिग स्टार एकत्र एका मंचावर दिसतील.

 

खरं तर हे सगळं काही सुरू आहे अमिताभ बच्चन यांच्या 'शमिताभ' या चित्रपटासाठी... ह्या चित्रपटाचं म्यूझिक लॉन्च आज मुंबईत होतंय. ह्या चित्रपटात अमिताभ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर त्यांच्याबरोबर ह्या चित्रपटात धनुष आणि अक्षरा हसन पण आहे. अमिताभ, रजनीकांत आणि कमल हसन यांनी सुप्रसिद्ध संगीतकार इल्लैया राजा ह्यांच्या सन्मानार्थ 'शमिताभ' ह्या चित्रपटाचे संगीत कंपोज केल्याचं बोललं जातंय.

या सोहळ्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की हे खूप उत्साहित आहेत. हे म्युझिक लॉन्च करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून सगऴ्यांना निमंत्रण पाठवलं आहे. धनुष साऊथच्या चित्रपटातील अभिनेता आहे आणि रजनीकांत हयांचा जावई आहे, तर अक्षरा ही कमल हसन ह्यांची धाकटी मुलगी आहे. एकूणच अमिताभ, रजनीकांत आणि कमल हसन हे तिघंही या चित्रपटाशी कोणत्या न कोणत्या संबंधात जोडले गेले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.