कोणाबरोबर अडकली लिफ्टमध्ये सनी लिऑन?

सनी लिऑन तिच्या मोहक अदाकारांमुऴे बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिली आहे. त्यात तिचे फॅन्स तिच्याशी संबंधित सगऴ्या गोष्टींवर नजर ठेवून असतात.

Updated: Jan 19, 2015, 07:05 PM IST
कोणाबरोबर अडकली लिफ्टमध्ये सनी लिऑन? title=

मुंबई : सनी लिऑन तिच्या मोहक अदाकारांमुऴे बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिली आहे. त्यात तिचे फॅन्स तिच्याशी संबंधित सगऴ्या गोष्टींवर नजर ठेवून असतात.

 

नुकताच सनी बरोबर एक असा प्रकार घडला ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती.

 

त्याचं झाल असं की, सनी लिऑन आणि तिचा नवरा डॅनियल वेबर एकत्र एका मॅगजीनच्या कवर पेजवर दिसणार आहेत. या संदर्भात ही जो़डी मुंबईमध्ये मॅगजीनचे कवर पेज लॉन्च करण्यासाठी आली होती.

 

परंतु, कार्यक्रमादरम्यान सनी तिचा नवरा आणि मॅनेजरबरोबर लिफ्टमध्ये अडकली. सनी आणि डॅनियलने खूप प्रयत्न करूनही लिफ्टचा दरवाजा उघडला नाही. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना टेक्निशियनची मदत घ्यावी लागली.

 

अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर टेक्निशियनने लिफ्टचा दरवाजा उघडला. अखेर सनी आणि डॅनियल बाहेर आले. इतके होऊनही सनी आणि डॅनियल हसत चेहऱ्याने बाहेर आले.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.