पहिल्याच फोटोशूटनंतर अनुष्का शेट्टी झाली होती रिजेक्ट

बाहुबली २मध्ये देवसेना हे पात्र साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जातेय. बाहुबली २ मधून अनुष्का आता जगभरात प्रसिद्ध झालीये. मात्र या इंडस्ट्रीत येण्याचा तिचा अनुभव खराब होता. 

Updated: May 16, 2017, 09:41 PM IST
पहिल्याच फोटोशूटनंतर अनुष्का शेट्टी झाली होती रिजेक्ट title=

मुंबई : बाहुबली २मध्ये देवसेना हे पात्र साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जातेय. बाहुबली २ मधून अनुष्का आता जगभरात प्रसिद्ध झालीये. मात्र या इंडस्ट्रीत येण्याचा तिचा अनुभव खराब होता. 

सोशल मीडियावर सध्या अनुष्काच्या एका ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तिचे जुने फोटो आहेत. अनुष्का शेट्टीचे ते फोटोशूट होते. 

या तिच्या पहिल्याच फोटोशूटमध्ये तिला चक्क रिजेक्ट करण्यात आले होते. अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहेय. सिनेमात आल्यानंतर तिने हे नाव बदलले. २००५मध्ये तिने तेलुगु सिनेमा सुपरमधून कारकिर्दीची सुरुवात केली होती. 

२००६मध्ये आलेल्या विक्रमारकुडू या सिनेमाने तिला मोठे यश मिळवून दिले. हा सिनेमा एस एस राजामौली यांचाच होता. त्यानंतर तिने राजामौलीसोबत तीन सिनेमे केले.