'मलायका दूर जाणे हा विचार नको' - अरबाज

'माझे मलायकावर प्रेम आहे पण मला तिला गमवायचे नाहीये. ती खुपच सुंदर आणि माझी जिवलग आहे. या जगात मी सर्वांत जास्त तिच्यावर प्रेम करतो. तिला गमवायची मला भीती वाटते,' असं अरबाज खानने म्हटलं आहे.

Updated: Mar 3, 2016, 06:24 PM IST
'मलायका दूर जाणे हा विचार नको' - अरबाज

मुंबई : 'माझे मलायकावर प्रेम आहे पण मला तिला गमवायचे नाहीये. ती खुपच सुंदर आणि माझी जिवलग आहे. या जगात मी सर्वांत जास्त तिच्यावर प्रेम करतो. तिला गमवायची मला भीती वाटते,' असं अरबाज खानने म्हटलं आहे.

अरबाज खान आणि मलायका अरोरा खान हे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या रंगत आहेत. यावरून १७ वर्षांच्या सुखी संसारानंतर आता अरबाज म्हणतो, 'मी मलायकाविषयी पझेसिव्ह मी कधीच नव्हतो. पण जसा काळ बदलला तसा माझ्यातही बदल होत गेला. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा मिळवता तेव्हा तिला स्वत:पासून दूर करणे हा विचारच तुम्हाला अस्वस्थ करतो'.