आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर

 राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 18, 2017, 01:16 PM IST
आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे. तरूणांनी मतदान करावं, हा यामागे निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

मात्र रिंकू राजगुरू अजूनही सज्ञान नसल्याचं सांगण्यात येत आहे. रिंकूचं वय हे १८ वर्षाच्या आत असल्याचं सांगण्यात येत आहे, तरीही तिला ब्रँड अॅम्बेसेडर का बनवलं हा प्रश्न उपस्थित होत आहे.

रिंकू राजगुरूचं वय कमी आहे, अजून तिने कधीही मतदान केलेलं नाही, ती मतदान करण्याचा संदेश देत आहे, हे कसं अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहे.

सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू या वर्षी दहावीत आहे. रिंकूने जेमतेम १६ वर्ष वय पूर्ण केलं असावं असं म्हटलं जात आहे.

मात्र, आर्ची आणि परशाचे हे पोस्टर राज्यात विविध ठिकाणी झळकू लागले आहेत, आर्ची आणि परशा पोस्टरवर झळकल्याने, ही जाहिरात सरकारी असली तरी अधिक आकर्षक वाटू लागल्याने, अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे.