अभिनेत्री आसिन लवकरच चढणार बोहल्यावर, अक्षय कुमारने जमवलं लग्न!

'गजनी' फेम अभिनेत्री आसिन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. ती लग्नासाठी तयार असून तिनं तिचा जोडीदार निवडलाय. विशेष म्हणजे हे सगळं घडवून आणलंय 'खिलाडी ७८६' अक्षय कुमारने...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 10, 2015, 10:54 AM IST
अभिनेत्री आसिन लवकरच चढणार बोहल्यावर, अक्षय कुमारने जमवलं लग्न!

मुंबई: 'गजनी' फेम अभिनेत्री आसिन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. ती लग्नासाठी तयार असून तिनं तिचा जोडीदार निवडलाय. विशेष म्हणजे हे सगळं घडवून आणलंय 'खिलाडी ७८६' अक्षय कुमारने...

आसिनच्या जोडीदाराचं नाव आहे राहुल शर्मा... राहुल दिल्लीतील व्यावसायिक आहे. अक्षय कुमार आणि राहुल दोघं खूप चांगले मित्र आहेत आणि आसिन-राहुलचं जमवण्यात अक्षय कुमारचा मोठा हात आहे.

लग्नापूर्वी आसिनला आपले सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे आहेत. सध्या आसिन 'ऑल इज वेल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आसिननं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली होती. आमिर खानच्या गजनी चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली. सलमान खान, अजय देवगण सारख्या बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत तिनं काम केलंय. 

आसिन-राहुलच्या लग्नाबद्दलच्या सर्व अपडेट्स आम्ही देत राहु, आसिनला लग्नासाठी शुभेच्छा!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.