व्हिडिओ: आयुषमानच्या ‘हवाइजादा’च्या ट्रेलरला १० लाख हिट्स!

अभिनेता-गायक आयुषमान खुराणा आपल्या नव्या फिल्मसह प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. त्याचा आगामी चित्रपट ‘हवाइजादा’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धमाल करतोय. मंगळवारी रिलीज झालेल्या या ट्रेलरनं आतापर्यंत १० लाख हिट्सचा टप्पा ओलांडलाय. 

Updated: Dec 28, 2014, 10:39 AM IST
व्हिडिओ: आयुषमानच्या ‘हवाइजादा’च्या ट्रेलरला १० लाख हिट्स! title=

मुंबई: अभिनेता-गायक आयुषमान खुराणा आपल्या नव्या फिल्मसह प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. त्याचा आगामी चित्रपट ‘हवाइजादा’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धमाल करतोय. मंगळवारी रिलीज झालेल्या या ट्रेलरनं आतापर्यंत १० लाख हिट्सचा टप्पा ओलांडलाय. 

‘विकी डोनर’नंतर आयुषमानचे दुसरे चित्रपट म्हणावे तसे चालले नाहीत. मात्र ‘हवाइजादा’ ही कसर भरून काढेल आणि आयुषमानचं करिअर पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री पल्लवी शारदा चित्रपटात आयुषमानच्या हिरोइनच्या रूपात आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून ही कथा आहे मराठमोळ्या शिवकर बापुजी तळपदे यांची... 
पहिलं विमान कोणी उडवलं असं विचारलं तर आपल्याला फक्त राईट्स (१९०३) बंधूंचं नाव सांगण्यात येतं. पण मध्ये राईट्स बंधूंच्या किती तरी वर्षांपूर्वी शिवकर तळपदे यांनी जगातील पहिलं विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता. ‘हवाइजादा’मध्ये हेच दाखवण्यात आलंय. चित्रपटाचं पहिले नाव 'Bambai Fairytal' होतं. 

चित्रपटात मिथून चक्रवर्तींचीही महत्त्वाची भूमिका आहे. ही फिल्म ३० जानेवारी २०१५ला रिलीज होणार आहे. 

पाहा हा धमाकेदार व्हिडिओ:  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.