बाहुबली 2ची सगळी गाणी रिलीज

२०१५मध्ये आलेल्या बाहुबलीच्या यशात त्याची कथा सादरीकरणासहीत संगीताचाही तितकाच वाटा होता.

Intern Intern | Updated: Mar 29, 2017, 05:49 PM IST
बाहुबली 2ची सगळी गाणी रिलीज title=

मुंबई : २०१५मध्ये आलेल्या बाहुबलीच्या यशात त्याची कथा सादरीकरणासहीत संगीताचाही तितकाच वाटा होता. आताही बाहुबली : द कंक्ल्युजनमध्ये प्रेक्षकांना
अशीच सांगितिक मेजवानी मिळणार आहे.

 
येत्या एप्रिलमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाची सगळी गाणी रिलीज करण्यात आली आहेत. त्याच्या ट्रेलरप्रमाणेच ही गाणीसुध्दा तितकीच लोकप्रिय ठरत आहेत.
ही सर्व गाणी तेलुगू भाषेतील आहेत. 

या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवानी आहेत, ज्यांनी एम.एम. करीम या नावाने हिंदी चित्रपटातही संगीत दिलं आहे.