'बालिका वधू'तल्या सांचीनं केलं गुपचूप लग्न

बालिका वधू या गाजलेल्या मालिकेमध्ये सांचीची भूमिका करणाऱ्या रूप दुर्गापालनं गुपचूप लग्न केलं आहे.

Updated: Jun 13, 2016, 06:54 PM IST
'बालिका वधू'तल्या सांचीनं केलं गुपचूप लग्न title=

मुंबई : बालिका वधू या गाजलेल्या मालिकेमध्ये सांचीची भूमिका करणाऱ्या रूप दुर्गापालनं गुपचूप लग्न केलं आहे. एका स्पोर्ट्स चॅनलमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या दीपक नैलवाल याच्याबरोबर रूपचं लग्न झालं आहे. 

बालिका वधू या मालिकेबरोबरच रूप स्वरागिनी या मालिकेमध्ये काव्या मल्होत्राची भूमिका करत आहे. माझं दीपकबरोबर कधीच लग्न झालं आहे, आमचं लव्ह मॅरेज नसुन अरेंज मॅरेज असल्याचं रूपनं सांगितलं आहे. 

माझं वैयक्तीक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ नयेत. माझ्या कामाचीच चर्चा व्हावी म्हणून या दोन्ही गोष्टी मी वेगळ्या ठेवल्या अशी प्रतिक्रिया रूपनं दिली आहे. 

माझ्या आयुष्यातल्या जवळच्या व्यक्तींना माझं लग्न झाल्याची माहिती आहे. माझं लग्न झाल्याचं कोणाला ओरडून सांगायची मला गरज वाटत नसल्याचंही रूप म्हणाली आहे.