मुंबई : अभिनेते बमन इराणी यांनी पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खानबरोबर पाकिस्तानमधल्या कराची विमानतळावर मागच्याच महिन्यामध्ये गैरवर्तणूक करण्यात आली होती.
कबीरला मिळालेल्या या वागणुकीमुळे बमन इराणी नाराज झाला, आणि त्यानं आधी होकार दिलेल्या चित्रपटाला या घटनेनंतर नकार दिला अशी माहिती मिळत आहे.
या पाकिस्तानी चित्रपटाचे दिग्दर्शक आझान समी खान यांनी मात्र कबीर खानच्या घटनेमुळे बमन इराणींनी नकार दिल्याच्या बातम्या फेटाळल्या आहेत. बमन इराणींना या चित्रपटासाठी तारखा मिळत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.