नवी दिल्ली : जेव्हा तुमची वेळ योग्य नसते तेव्हा एक एक करुन सर्वच साथ सोडतात. बॉबी देओलसोबतही असेच काहीसे होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून बॉबी देओल समस्यांनी त्रस्त आहे.
बॉबी गेल्या अनेक महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. दुसऱ्या निर्मात्यांनी तर त्याच्याकडे पाठ फिरवलीच आहे मात्र भाऊ सनी देओलनेही त्याला केवळ दिलासाच दिलाय. घरात बसून बॉबी करणार तरी काय. यासाठी बॉबी कामाच्या शोधात दिल्लीला आलाय.
बॉबी देओल अशा घराण्यातून आलाय ज्या घराण्याने अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर राज्य केलेय. बॉबीचे वडिली धर्मेंद्र यांनी अनेक वर्षे बॉलीवूडवर राज्य केले.
सनी देओल २००५नंतर चित्रपटात कमी दिसू लागला. मात्र त्याच्याआधीच बॉबी देओल रुपेरी पडद्यावर कमी दिसू लागला होता. एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्याने बॉबीकडे चित्रपटांच्या ऑफर्सही घटल्या. बॉबी आणि सनीकडे एकाही चित्रपटाच्या ऑफर्स येत नव्हत्या.
यावेळी सनीने स्वत: घायलचा सिक्वेल बनवला आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला. सध्या सनी देओल त्याच्या मुलाच्या करियरबाबत विचारात असल्याने बॉबीला कामासाठी दिल्लीत यावे लागलेय. बॉबी आता डीजे म्हणून काम करणार असल्याची चर्चा आहे.