दबंग३मध्ये परिणीती चोप्रा?

आत्तापर्यंत दबंग सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच लीड हिरोईन म्हणून दिसली आणि रज्जोच्या भूमिकेत प्रेक्षकांनाही ती भावली. पण आता अरबाजला दबंग 3मध्ये सोनाक्षी नकोय. 

Updated: Jul 21, 2016, 07:48 AM IST
दबंग३मध्ये परिणीती चोप्रा? title=

मुंबई : आत्तापर्यंत दबंग सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच लीड हिरोईन म्हणून दिसली आणि रज्जोच्या भूमिकेत प्रेक्षकांनाही ती भावली. पण आता अरबाजला दबंग 3मध्ये सोनाक्षी नकोय. 

सोनाक्षीऐवजी नवी हिरोईन घेण्याचे अरबाजने जवळजवळ नक्की केलयं. सध्या ढिशूममधील आयटम साँगमुळे परिणीत जोरात आहे. त्यामुळे रज्जोच्या भूमिकेसाठी परिणीती अगदी फिट आहे, असे अरबाजला वाटतये. 

सोनाक्षीने अरबाजचा 'डॉली की डोली' नाकारला आणि तेव्हापासून अरबाज व सलमानशी सोनाक्षीचे बिनसले. अर्पिताच्या लग्नातही सलमान व सोनाक्षीमधील मतभेद दिसले. सलमानचं सोनाक्षीशी काम करण्यास उत्सुक नसल्याने अरबाजच्या प्रॉडक्शन हाऊसने परिणीतीकडे मोर्चा वळविला आहे.