'लिपस्टिक अंडर माय बुरखा' वर सेन्सॉर बोर्डाचे आक्षेप

निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे.

Updated: Feb 24, 2017, 11:18 PM IST
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' वर सेन्सॉर बोर्डाचे आक्षेप title=

मुंबई : निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. हा चित्रपट महिलांच्या नेतृत्वापेक्षाही काल्पनिक कथेवर आधारित असल्याचं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे.

हा चित्रपट छोट्या शहरातील चार महिलांवर आधारित असून, या चित्रपटात अश्लिलतेचा कळस गाठण्यात आल्याचं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे. प्रकाश झा यांनी CBFC च्या निर्णयाला आव्हान देण्याचे संकेत दिले असून बॉलीवूडही त्यांना पाठिंबा देत आहेत.

या चित्रपटाला मुंबई फिल्म फेस्टीवलमध्ये पसंतीची पावतीही मिळाली होती. मियामी फिल्म फेस्टीव्हलमध्येही ऑक्सफेम पुरस्काराने या चित्रपटाला गौरविण्यात आलं होतं.