पाहा ट्रेलर : दावत-ए-इश्क

अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोपडा ही नवी जोडी ‘दावत-ए-इश्क’ या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

Updated: Jul 8, 2014, 11:04 AM IST
पाहा ट्रेलर : दावत-ए-इश्क title=

मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोपडा ही नवी जोडी ‘दावत-ए-इश्क’ या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

याच सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. यशराज फिल्म्स बॅनरखाली हा सिनेमा बनवला गेलाय. लखनौ आणि हैदराबादी तडका या सिनेमात मारला गेलेला दिसतोय. 

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतेय, हैदराबादची एक बिनधास्त मुलगी... ही भूमिका निभावतेय परिणिती चोपडा... तर लखनऊच्या एका ‘मस्का लव्हर’च्या भूमिकेत दिसतोय आदित्य रॉय कपूर... सिनेमात अभिनेता अनुपम खेर परिणितीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील.

निर्माता आदित्य चोपडा असलेल्या या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय हबीब फैजलनं... हा सिनेमा येत्या 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.