बेबी डॉलच्या ‘पिंक लिप्स’ला जबरदस्त हिटस्...

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओन हिच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘पिंक लिप्स’ हे गाणं हिट ठरलंय. हे गाणं यू ट्यूबवर आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय. 

Updated: Jul 8, 2014, 08:55 AM IST
बेबी डॉलच्या ‘पिंक लिप्स’ला जबरदस्त हिटस्... title=

मुंबई : बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओन हिच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘पिंक लिप्स’ हे गाणं हिट ठरलंय. हे गाणं यू ट्यूबवर आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय. 

या गाण्यातील सनी लिओनच्या बिनधास्त डान्सवर तिचे अनेक चाहते फिदा झालेत. ‘हेट स्टोरी 2’ या सिनेमातील हे गाणं सनीमुळे चांगलंच चर्चिलं गेलंय.   

‘हेट स्टोरी 2’ हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण, या सिनेमातील ‘पिंक लिप्स’ या गाण्याचा टीझर नुकताच यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता.

तरीही, या सिनेमातील या गाण्याला प्रेक्षकांनी उचलून धरलंय... त्यावर विविध प्रतिक्रियादेखील पाहायला मिळत आहेत. 

सनी लिओन या अगोदरही आयटम साँगवर थिरकताना दिसलीय. त्या गाण्यांमध्ये तिचा जलवा दिसलाच होता. त्यामुळे तिचे चाहते तिच्या या गाण्याची आवर्जुन वाट पाहत आहेत.

हे गाणं खुश्बू ग्रेवाल हिनं गायलंय तर जबिक कुमार यानं हे गीत लिहिलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.