... जेव्हा टॉम क्रूजच्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी पोहचली दीपिका!

सध्या आपला हॉलिवूड सिनेमा 'एक्सएक्सएक्स : द जेंडर केज' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली दीपिका हॉलिवूडमध्ये एन्जॉय करत असल्याचं दिसतंय. 

Updated: May 5, 2016, 07:39 PM IST
... जेव्हा टॉम क्रूजच्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी पोहचली दीपिका!

मुंबई : सध्या आपला हॉलिवूड सिनेमा 'एक्सएक्सएक्स : द जेंडर केज' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली दीपिका हॉलिवूडमध्ये एन्जॉय करत असल्याचं दिसतंय. 

Add Zee News as a Preferred Source

'द ममी'साठी ऑडिशन

हॉलिवूडमध्ये आणखीन संधा पटकावण्याची दीपिकाची इच्छा आहे... त्यामुळेच तर ती टॉम क्रूजचा आगामी सिनेमा 'द ममी'साठी ऑडिशन देण्यासाठी दाखल झालेली दिसली. 

दीपिकाची निवड होणार?

'स्पॉटबॉय.कॉम'नं दिलेल्या माहितीनुसार, दीपिकानं 'द ममी'च्या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी दीपिकानं ऑडिशन दिलं. परंतु, अद्याप या सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टरनं दीपिकाच्या निवडीबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

हुमा कुरेशीनंही दिली ऑडिशन 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी या भूमिकेसाठी हुमा कुरेशी हिनेदेखील ऑडिशन दिलंय. परंतु, ही भूमिका ब्रिटिश अभिनेत्री अन्नाबेले वालिस हिला मिळाल्याची कुजबूज सुरू आहे. ही एका आर्केलॉजिस्टची भूमिका आहे. 

 

About the Author