मुंबई : दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'तमाशा' या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होतंय. या सिनेमाचं शूटींग फ्रान्सच्या कोर्सिकामध्ये होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आहे दीपिका पादूकोण तर अभिनेता आहे दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर...
पण, या चित्रपटाच्या चित्रिकरणाआधीच दीपिकाची धाकधूक वाढलीय, असं खुद्द तिनंच सांगितलंय. 'मी या चित्रपटासाठी खूप उत्सूक आहे आणि त्याची प्रतिक्षाही करतेय. पण, हा माझा पहिलाच सिनेमा असल्यासारखी मला थोडी धाकधूकही आहे' असं दीपिकानं म्हटलंय.
दीपिकानं बुधवारी एफएचएम मॅगझिनचा एक अंक लॉन्च केला. त्यावेळी, ती बोलत होती. या अंकात दीपिकाला जगातील सर्वात आकर्षक महिला म्हणून गौरविण्यात आलंय.
२८ वर्षीय दीपिका म्हणतेय, 'हा सिनेमा म्हणजे माझा पहिलाच सिनेमा आहे, अशा पद्धतीनं माझ्या पोटात गुदगुल्या होतायत...'
दीपिका रणबीर कपूरसोबत पुन्हा एकदा काम करण्याची वाट बघतेय. ती यासाठी खूप उत्साहीदेखील आहे. ब्रेकअपनंतर दीपिका-रणबीरनं २०१३ मध्ये 'ये जवानी है दीवानी' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शनही इम्तियाज अलीनंच केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.