'मी व्हर्जिन' म्हणणाऱ्या दीपिकावर सेन्सॉरचा आक्षेप!

दीपिका पादूकोण आणि अर्जुन कपूर यांचा आगामी सिनेमा 'फाईंडिंग फॅनी'वर सेन्सॉर बोर्डाची कैची लागलीय. 

Bollywood Life | Updated: Aug 27, 2014, 01:46 PM IST
'मी व्हर्जिन' म्हणणाऱ्या दीपिकावर सेन्सॉरचा आक्षेप! title=

मुंबई : दीपिका पादूकोण आणि अर्जुन कपूर यांचा आगामी सिनेमा 'फाईंडिंग फॅनी'वर सेन्सॉर बोर्डाची कैची लागलीय. 

या सिनेमात एका सीनमध्ये 'व्हर्जिनिटी' या शब्दाचा वापर करण्यात आलाय... आणि यावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. त्यानंतर 'फाईंडिंग फॅनी'मधला हा डायलॉग हटविण्यात आलाय. काही रिपोर्टनुसार, सिनेमातील एका सीनमध्ये दीपिका अर्जुनला म्हणतेय... 'मैं व्हर्जिन हूँ'

दीपिकाचा हा डायलॉग काही सेन्सॉर बोर्डाला पसंत पडला नाही. त्यामुळे सिनेमाचा दिग्दर्शक होमी अदाजानिया याला नाईलाजास्तव हा डायलॉग हटवावा लागलाय. गंमत म्हणजे, 'व्हर्जिन' या शब्दाचा वापर याआधीही अनेक सिनेमांत केला गेलाय. 

सिनेमात आणखी एक सीन आहे... ज्यामध्ये अभिनेता पंकज कपूर अभिनेत्री डिंपल कपाडियाकडे एक टक पाहताना दिसतोय. या सीनमध्ये डिंपलच्या कपड्यांमध्ये असलेल्या 'होल'कडे पंकज टकमक पाहताना दाखवण्यात आलं होतं. सेन्सॉरनं यावरही आक्षेप घेतल्यानंतर यातील काही फ्रेम्स हटवण्यात आल्यात. 

'फाईंडिंग फॅनी' इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणवीर सिंह, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांचाही अभिनय पाहायला मिळणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.