कॉमेडी किंग कपिल शर्माच्या लग्नाचा फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावर सर्वांना हसवणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या नवऱ्याच्या पोषाखातील हा फोटो सध्या चर्चेचा विषय झालाय. त्याने लग्न केलं का, अशी चर्चा सुरु आहे.

Updated: Aug 6, 2015, 10:53 PM IST
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या लग्नाचा फोटो व्हायरल title=

मुंबई : छोट्या पडद्यावर सर्वांना हसवणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या नवऱ्याच्या पोषाखातील हा फोटो सध्या चर्चेचा विषय झालाय. त्याने लग्न केलं का, अशी चर्चा सुरु आहे.

कपिलने गुपचूप  लगीनगाठ बांधली, अशीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता कपिल शर्माच्या या फोटोचे सत्य पुढे आले आहे. त्याचा हा फोटो आगामी सिनेमातील आहे. 'किस किसको प्यार करु' या सिनेमातील लग्नाचा हा फोटो आहे.

kapil sharma and elli avram

कपिल शर्माची वधूची ही बिग बॉसची स्पर्धक आणि अभिनेत्री एली अवराम आहे. या सिनेमात कपिल चार अभिनेत्रींसोबत काम करत आहे. कपिल अजूनही सिंगल आहे आणि त्याचं लग्न अद्याप झालेले नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पाहा व्हिडिओ -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.