एकाच टी शर्टमध्ये दिसले श्रद्धा आणि आदित्य...

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात होत असल्या तरी या दोघांनी मात्र आपल्या नात्याबद्दल चुप्पीच राखणं पसंत केलंय. पण, काही अचानक घडतात आणि परत ही चर्चा सुरू होते... 

Bollywood Life | Updated: Jul 11, 2014, 03:10 PM IST
एकाच टी शर्टमध्ये दिसले श्रद्धा आणि आदित्य...  title=

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात होत असल्या तरी या दोघांनी मात्र आपल्या नात्याबद्दल चुप्पीच राखणं पसंत केलंय. पण, काही अचानक घडतात आणि परत ही चर्चा सुरू होते... 

अशीच चर्चा सुरू झालीय जेव्हा श्रद्धा आणि आदित्य एकाच टी शर्टमध्ये दिसले... त्यामुळे, आता हा टी शर्ट श्रद्धाचा आहे की आदित्यचा यावर जोरदार कोपरखळ्या मारल्या जातायत... 

त्याचं झालं असं, की सोशल वेबसाईट ट्विटरवर एक फोटो शेअर होत होता. @adityaandshraddha या नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर झाला होता. या फोटोत श्रद्धानं जो टी शर्ट घातला होता तोच टी शर्ट काही दिवसांपूर्वी आदित्यनं घातलेला दिसला होता... यामुळे, थोड्याच वेळात हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. त्यानंतर मात्र या अकाऊंटवरून हा फोटो अचानक गायब झाला. 

shraddhaaaditya
ट्विटरवरचा हाच तो फोटो

‘एबीसीडी 2’साठी श्रद्धा जेव्हा जिममध्ये प्रॅक्टीस करताना तिचा हा फोटो आहे, असं सांगितलं जातंय. तर हाच टी शर्ट घालून आदित्यला गेल्या वर्षी दुबईमध्ये पाहिलं गेलं होतं. यावेळी, ‘तो ये जवानी है दीवानी’चं प्रमोशन करत होता. 

सध्या, श्रद्धा आणि आदित्य दोघांचंही करिअर एका उंचीवर आहे. दोघांनी हीट फिल्मचा स्वाद घेतलाय... आता ते आपल्या नात्याला उघडपणे कबूल करणार का, हा त्यांच्या फॅन्ससाठी उत्सुकतेचा विषय बनलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.