मुंबई : महाराष्ट्र आरटीओने रोड टॅक्स न भरल्याने बॉलिवूड अभिनेता डॅनीवर जवळपास २९ लाखांचा दंड लावला आहे.
१३ फेब्रुवारीला अंधेरी आरटीओने डॅनीच्या रेंज रोवर कार जब्त केली होती. डॅनीची ही गाडी सिक्किम राज्याच्या पत्यावर नोंद आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी डॅनीच्या ड्रायवरने आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन दंड भरला आणि कार सो़डवून आणली. आरटीओने डॅनीवर २९ लाख ५६ हजार २३० रुपयांचा दंड लावला.