सैराटची क्रेझ कायम, आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण

सैराट सिनेमाची क्रेझ अद्याप महाराष्ट्रात आहे. या सिनेमातील आर्ची आणि परश्या या जोडीला या चित्रपटाने अमाप यश मिळवले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड आहे. 

Updated: Aug 15, 2016, 10:04 AM IST
सैराटची क्रेझ कायम, आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : सैराट सिनेमाची क्रेझ अद्याप महाराष्ट्रात आहे. या सिनेमातील आर्ची आणि परश्या या जोडीला या चित्रपटाने अमाप यश मिळवले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड आहे. 

त्यांनी तरुणाईमध्ये क्रेझ पाहता आर्ची अर्थात रिंकू राजगुरुला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणी म्हणून बोलवण्यात आले होते. 

मुंबईच्या भांडुपमधील एका शाळेत आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदेही उपस्थित होते.