गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलीवूडमध्ये

गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलीवूडमध्ये येणार या बातमीला वर्ष उलटलं आहे, मात्र नर्मदाच्या बॉलीवूड प्रवेशासाठी चित्रपट पाहिजे तसा गोविंदाला अजूनही मिळत नाहीय.

Updated: Jun 29, 2014, 08:24 PM IST
गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलीवूडमध्ये title=

मुंबई : गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलीवूडमध्ये येणार या बातमीला वर्ष उलटलं आहे, मात्र नर्मदाच्या बॉलीवूड प्रवेशासाठी चित्रपट पाहिजे तसा गोविंदाला अजूनही मिळत नाहीय.

पहिल्या चित्रपटाची वाट पाहता पाहता नर्मदाचं वय तर निघून जाणार नाही ना, असं ही म्हटलं आहे.

नर्मदा आपल्या पहिल्या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. पंजाबी अॅक्टर गिप्पी ग्रेवाल यांच्यासह नर्मदा पहिला चित्रपट साकारेल अशी शक्यता आहे. 

या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. हा कॉमेडी सिनेमा असेल, या सिनेमाचं दिग्दर्शन समीप कांग करणार आहे. ऑगस्टमध्ये या चित्रपटाचं शुटींग सुरू होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.